रामपूर : उत्तर प्रदेशात भाताच्या सुधारित जातींमध्ये समाविष्ट केलेला पीआर -१२६ तांदळाला खुल्या बाजारात योग्य भाव शेतक-याला मिळाला नाही. त्यानंतर शासकीय केंद्रांवरही तेच झाले. त्यामुळे संतप्त शेतक-याने गांधीगिरी करत शेतातील पीक मोफत घेऊन जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे थोड्याच वेळात आसपासच्या ग्रामस्थांनी साडेसहा एकर शेतातील भात पीक काढून घेतले. या शेतकऱ्याने शासनाच्या धोरणांविरोधात गांधीगिरी पद्धतीने निषेध करण्याची अनोखी पद्धत परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
पीआर -१२ ग्रेड धान (भात ) देणारी जात उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सरासरी बाजारात त्याची किंमत प्रति क्विंटल दोन हजार रुपये इतकी आहे, परंतु, या किंमतीला, सरकार किंवा व्यापारी यांनी खरेदी केला नाही. शासकीय केंद्रांवर धानाला आधार भाव १८६८ रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे .परंतु पीआर -१२६ यासह उच्च प्रतीचे धान (तांदूळ ) वाण सरकारी केंद्रांवर खरेदी केले जात नाहीत. रामपूरमध्ये चांगल्या प्रतीच्या भातला योग्य दर मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी सरकारला पत्रही पाठविले होते, परंतु त्याचा चांगला परिणाम मिळाला नाही.
शासकीय केंद्रांवर पीआर -१२६ प्रकारातील तांदूळ खरेदी न केल्याने व खुल्या बाजारात चांगला भाव न मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वर तहसील परिसरातील नबीगंज गावात राहणारे तरुण शेतकरी मनिंदरसिंग यांनी मोफत तांदूळ पीकाच्या कापणीची घोषणा केली. त्यादरम्यान जवळपासच्या ग्रामस्थांनी तांदूळ पीक विनामूल्य घेण्यास सुरुवात केली. मनिंदरसिंग म्हणाले की, गावकऱ्यानी साडेसहा एकरात पसरलेल्या भातचे संपूर्ण पीक कापून घरी नेले. मनिंदरसिंग यांच्या मते, बाजारात प्रतिक्विंटल १२०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही, तसेच धान्य (पीआर -१२६) हे सरकारी केंद्रांवर खरेदीसाठी वैध नाही. शासन स्तरावरून या धानाच्या चांगल्या भावासाठी कोणतीही व्यवस्था न मिळाल्याच्या निषेधार्थ पिकाचे निशुल्क वितरण करण्याचे ठरविण्यात आले आहे. मनिंदरसिंग पुढे म्हणतात की, धान काढणीनंतर शेतात पेंढा ( भाताची तुसे ) जाळण्यावर बंदी आल्याने पुढील पिकासाठी जमीन तयार करण्यात ट्रॅक्टरच्या डिझेलचा मोठा खर्च होत आहे. पेंढा असल्याने जमीन गहू व मटार पेरण्यासाठी तयार नाही.