नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून भारतीय क्रिकेट संघातील अनेक माजी दिग्गज खेळाडूनां कोरोना झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अलीकडेच भारतात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड क्रिकेट सिरीजमध्ये सहभागी झालेल्या चार भारतीय खेळाडूंची कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.
सचिन तेंडुलकर कोरोना बाधित झाल्याची पहिली बातमी समोर आली. त्यानंतर आणखी तीन खेळाडू पॉझिटिव्ह झाल्याचे आढळले आहेत. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युसूफ पठाणनेही आपल्या कोरोना पॉझिटिव्हविषयी माहिती दिली. यानंतर रविवारी माजी फलंदाज एस. बद्रीनाथने कोरोना संक्रमणाबद्दल सांगितले आणि आता माजी अष्टपैलू इरफान पठाण देखील कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.
इरफानचा मोठा भाऊ आणि इंडिया लीजेंडचा सहकारी युसूफ कोरोना संक्रमित असल्याचे दिसून आल्याने इरफानचा त्याच्या चाचणीची वाट पाहत होता. सोमवारी रात्री इरफानने ट्विट करुन अखेर आपल्या संसर्गाची माहिती दिली. तसेच त्याने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्वांनाच कोरोनाची चाचणी करुन स्वत: ला अलग ठेवण्यासाठी सल्ला देऊ, सर्वांना एकच सांगू इच्छितो की, मास्क घालणे आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करणे योग्य होय. विशेष म्हणजे नुकत्याच संपलेल्या वर्ल्ड रोड सेफ्टी सिरीजमध्ये भारत आणि श्रीलंकाच्या दिग्गज संघांनी अंतिम फेरी गाठली. येथे सामना जिंकून भारताने जेतेपद जिंकले.