मुंबई – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची कन्या आलिया कश्यप ही सध्या सोशल मिडियामध्ये ट्रोल होत आहे. त्याचे कारण आहे तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला बिकीनी फोटो. अनेकांनी त्यावर टीका केली आहे. ही टीका पाहून आलिया अत्यंत व्यथित झाली आहे. त्यानंतर तिने एक पोस्ट टाकली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, मी मानसिकदृष्ट्या गेल्या काही दिवसांपासून तणावात आहे. माझे बिकीनीतील फोटो पाहून मला अत्यंत वाईट पद्धतीच्या कमेंट मिळाल्या आहेत. मी खुप घाबरले. ही पोस्ट डिलीट करण्याचे माझे मत झाले. मात्र, मला वाटते की भारतात दुष्कर्माचे वातावरण वाढत आहे. यामुळे महिलांची टिंगल केली जात आहे. आलियाच्या समर्थनार्थ अनुरागची पहिली पत्नी कल्कि आणि खुशी कपूर सुद्धा आले आहेत. त्यांनी आलियाचे समर्थन केले आहे.