नाशिक – नववर्ष स्वागत समिती, नाशिक यांचे तर्फे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ‘साधना’ मैफिल ( शनिवार ) १९ सप्टेंबर २०२० रोजी सायं ७.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. यात देवश्री नवघरे-भार्गवे यांचे गायन असून रसिक कुलकर्णी यांची तबलासाथ, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी संवादिनी वर साथ केली आहे. है मैफिल ऑनलाईन असून रसिकांना घरबसल्या आनंद घेता येणार आहे. यासाठी प्रवेशिका नाममात्र शुल्क रु.१०० असून ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने ऑनलाईन पद्धतीने कलोपासक व कलासक्त यातील दुवा होण्याचा प्रयास याद्वारे करण्यात आला आहे.
प्रवेशिकेसाठी https://www.hungamacity.com/event/26745/sadhana-hindustani-classical येथे भेट द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.