मुंबई – अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची १५ दिवसांत सीबीआयने चौकशी करुन प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. त्यानंतर त्यांनी नैतिकदृष्या या पदावर राहणे योग्य नसल्याचे सांगत हा राजीनामा दिला आहे.
परमबीर सिंह यांनी मुंबईतील बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप केला होता. सिंह यांनी अगोदर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे आरोप केले होते. त्यामुळे खळबळ निर्माण झाली होती. विरोधी पक्षांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी सुध्दा केली होती. पण, देशमुख यांनी त्यावेळेस राजीनामा दिला नाही. पण, आज उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2021