मुंबई – मोबाईल फोन आपल्या जगण्याचा आता एक अविभाज्य घटक झाला आहे. आपण थोडावेळ देखील फोनशिवाय राहू शकत नाही. मात्र बरेचदा टेलिमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्सने आपण हैराण होऊन जातो.
बरेचदा आपण या कॉल्सकडे दुर्लक्ष करतो. पण त्यामुळे महत्त्वाचे कॉल्सही सुटून जातात. अश्यात तुम्ही डीएनडी म्हणजे डू नॉट डिस्टर्ब या फिचरचा वापर करू शकता. इथे आपण जिओ, एअरटेल आणि आयडियामध्ये हे फिचर कसे वापरायचे याची पद्धत जाणून घेऊया.
जिओ – माय जिओ एपवर लॉग इन करून डाव्या बाजुला सेटिंग्समध्ये जा. तिथे तुम्हाला डीएनडीचा पर्याय दिसेल. त्यानंतर कंपनीकडून तुम्हाला एक मेसेज येईल. त्यात लिहीले असेल की डीएनडी सर्व्हिस 7 दिवसांच्या आत एक्टीव्ह होईल.
व्होडाफोन–आयडिया – युझर्सला वेबसाईटवर जाऊन डीएनडी पेजवर जावे लागेल. त्यात तुमचे काही डिटेल्स द्यावे लागतील. त्यात नाव, इ–मल, आयडी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर नंबर मागितला जाईल. त्यानंतर तुम्हाला फुल्ल डीएनडी पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. त्याला एंटर केल्यानंतर सबमीटवर क्लिक करा. त्यानंतर हा पर्याय एक्टीव्ह होईल.
एअरटेल – सर्वांत पहिले एअरटेल वेबसाईटवर जावे लागेल. तिथे मोबाईल सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या पॉप–अप बॉक्समध्ये आपला नंबर टाका. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला स्टॉपचे आप्शन येईल. त्यानंतर ही सर्व्हिस सुरू झालेली असेल.