मुंबई – मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने अनलॉक ५ ची मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट सुरू होणार आहेत. येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने ही परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. थर्मल स्क्रीनिंग, हँडवॉश, सॅनिटायझर यांचा वापर सक्तीचा राहणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारनेही अनलॉक ५ जाहीर केले असून १५ ऑगस्टपासून मल्टीप्लेक्स, चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, शाळा, कोचिंग क्लास सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यांना परवानगी
- राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांना परवानगी
- ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कुठलेही निर्बंध नाही
- अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादन करणाऱ्या उद्योगांना परवानगी
- लोकलमध्ये डब्बेवाल्यांना प्रवासाची परवानगी
- मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढविण्यास मान्यता
हे बंदच राहणार
शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क
केंद्राकडूनही अनलॉक ५ जाहीर
केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या अनलॉक ५ नुसार, येत्या १५ ऑक्टोबरपासून मल्टीप्लेक्स, एकपडदा चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, केवळ ५० टक्के प्रेक्षकांनाच मान्यता असणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंसाठी स्विमिंग पूल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर पासून शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्याची मुभा राज्य सरकारांना दिली आहे. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानंतर त्या त्या राज्य सरकारांकडून घोषणा केली जाणार आहे. त्यानंतरच हे सारे सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.