शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अधिवेशन सुरू; विरोधकांचा सभात्याग.

by India Darpan
सप्टेंबर 8, 2020 | 8:48 am
in राज्य
0
4 5

मुंबई – राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन, आजपासून (७ सप्टेंबर) मुंबईत सुरु झालं. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला आज वंदेमातरमनं सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी, २९ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात, वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या.

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या वर प्रशासक नेमण्याबाबत सरकारने मांडलेले विधेयक संविधान संमत नसून उच्च न्यायालयात सरकारने घेतलेल्या भूमिकेशी विसंगत असून ते मांडण्यास विरोधकांनी विधानसभेत विरोध केला तो उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अमान्य केल्यानं विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. ५ वर्षांची मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या वर कोणालाही प्रशासक म्हणून न नेमता योग्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनाच नेमावे अशी मागणी आम्ही उच्च न्यायालयात केली असून न्यायालयात सरकारच्या वतीने ती मान्य केली असूनही विधेयकात त्याचा उल्लेख नाही याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेतली, त्यावर हे फक्त विधेयक मांडले आहे चर्चेत त्यावर भूमिका मांडू असं ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं, त्यांच्या या विधानाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दुजोरा दिला, मात्र विरोधकांना ते अमान्य होतं, मात्र उपाध्यक्ष झिरवळ यांनी सरकारला विधेयक मांडण्याची परवानगी देत विरोधकांची हरकत फेटाळली त्यावर विरोधकांनी सभात्याग केला. सभागृहात पुन्हा येताच विरोधी पक्षनेते यांनी उच्च न्यायालयाने आमची भूमिकाच योग्य असल्याचं नुकतंच मान्य केल्याचं सभागृहात सांगितलं. त्याआधी उपाध्यक्षांनी अधिवेशन काळात घ्यायच्या खबरदारीच्या सूचना देत त्या पालन करण्याचं आवाहन केलं, त्यानंतर बालाजी किणीकर, दौलत दरोडा, संग्राम थोपटे आणि कालिदास कोलंबकर यांची तालिका अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक केल्याचं जाहीर केलं.

उपसभापती निवडणूक उद्या
विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार असल्याचं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना सभागृह नेते अजित पवार यांना सभापतींनी यावेळी दिल्या. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि अन्य भाजपा सदस्यांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची आग्रही मागणी केली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली होती. मात्र कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी समंजस भूमिका घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपर्क ठेवायला हवा होता, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. तोपर्यंत सर्वांच्या संमतीनं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.

दिवंगतांना श्रद्धांजली

प्रसाद लाड, मनीषा कायंदे, संजय दौंड आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून सभापतींनी आज नावं जाहीर केली.  शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसच्या राजेश राठोड, तसंच भाजपच्या रणजित सिंह मोहिते पाटील, रमेश कराड, प्रवीण दटके या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून देण्यात आला, भाजपचे गोपीचंद पडळकर आज उपस्थित नव्हते. माजी राष्ट्रपती डॉ प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर तसंच माजी सदस्य विजय मुडे, रामनाथ मोते, बलभीमराव देशमुख, युनूस हाजी शेख आणि जयंतराव ठाकरे यांच्यासह अन्य दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहणारा शोक प्रस्ताव विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, तर विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला आणि सभागृहाच्या वतीनं श्रध्दांजली अर्पण केली. सामान्य माणूस ते राष्ट्रपती पदापर्यंतचा भारतरत्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी असा प्रवास करताना ते अजात शत्रू राहिले हे त्याचे वैशिष्टे होते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकप्रस्तावात काढले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Next Post

बाप रे! ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा; कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव संकटात

Next Post

बाप रे! ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा; कोरोनाच्या गंभीर रुग्णांचा जीव संकटात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011