अहमदाबाद – जगातल्या सर्वात मोठ्या मोतेरा क्रिकेट स्टेडिअमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज झाले. साबरमतीजवळ नव्यानं बांधण्यात आलेलं हे स्टेडिअम जगातील सर्वात मोठं समजलं जाणारं आणि मेलबर्न क्रिकेट स्टेडिअमपेक्षा मोठं आहे.
जगातल्या सर्वात मोठा सरदार पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीनंतर सर्वात मोठं स्टेडिअम बांधण्याचा मान गुजरातच्या नावावर आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान तिसरा क्रिकेट कसोटी सामना या स्टेडिअमवर आजपासून सुरू झाले आहे.
६३ एकर परिसरातल्या या स्टेडिअमध्ये जवळपास १ लाख १० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशननं १९८२ रोजी बांधलेल्या स्टेडिअममध्ये प्रेक्षकांची क्षमता ५३ हजार होती.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/PBNS_India/status/1364419891453825026