बंगळुरू – कर्नाटक विधीमंडळात आज मोठी दुर्देवी घटना घडली. गोरक्षणाच्या कायद्यावरुन सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. काही संतप्त आमदारांनी तर थेट हाणामारीच केली. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर चक्क सभापतींनाही खुर्चीतून खेचण्यात आले. या प्रकाराबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विधीमंडळाच्या परंपरेत अशी दुर्देवी घटना घडणे योग्य नाही, अशी प्रतिक्रीया जाणकारांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या गोंधळातच हे विधेयक संमत करण्यात आले आहे.
बघा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1338736257812197377