नवी दिल्ली – बँक खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी. बँक खात्यासंदर्भात ज्या ग्राहकांचे कामे प्रलंबित आहेत, अशांनी ती कामं या आठवड्यातच आटोपून घ्यावीत. नाहीतर ५ एप्रिलपर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे. येत्या २७ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत फक्त दोन दिवस बँकेत कामं होतील. त्यामुळे तुमची कामं लवकरच आटोपून घ्यावीत. दुसरा शनिवार आणि धूलिवंदन असल्यानं २७ ते २९ मार्चपर्यंत सलग तीन दिवस बँका बंद असतील. त्याशिवाय पाटणा इथं सलग चाल दिवस बँक शाखा बंद राहतील.
३१ मार्च बँकांचा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांना प्रवेश बंद असतो. बँका आपले वार्षिक खातं बंद करून टाकतात, त्यामुळे १ एप्रिलला सुटी असते २ एप्रिलला गुड फ्रायडे आहे. त्यामुळे देशभरातील बँका बंद असतात.
बँका बंद राहण्याचे दिवस
२७ मार्च – महिन्याचा शेवटचा शनिवार
२८ मार्च – रविवार
२९ मार्च – धुलीवंदन
३० मार्च – धूलिवंदनानिमित्त फक्त पाटणा इथं बँका बंद (अन्य ठिकाणी बँका सुरू राहतील)
३१ मार्च – आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असला तरी बँका सुरू राहतील
१ एप्रिल – बँकांचा लेखाजोखा ठेवण्याचा दिवस (ग्राहकांसाठी बँक बंद राहतील)
२ एप्रिल – गुड फ्रायडे
३ एप्रिल – बँक खुल्या राहतील
४ एप्रिल – रविवार