नाशिक – जिल्ह्यात सातत्याने जोरदार अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा पुरता संकटात सापडला आहे. काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्यात कांदा, टोमॅटो, बाजरी, मका, ज्वारी आदी पिकांचे जोरदार वादळी पावसामुळे नुकसान होउन शेतातील उभी पीके भुइसपाट झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नुकसान झालेल्या शेतपिकांचे, घरांचे पंचनामे त्वरित करावेत अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचेकडे पत्रद्वारे केली आहे.