बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अण्णा भाऊंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा

by India Darpan
ऑगस्ट 2, 2020 | 11:08 am
in इतर
0
IMG 20200801 WA0034

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मोहीम
नाशिक : असामान्य प्रतिभेच्या व्यक्तिमत्त्वाला म्हणजेच लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशा मागणीचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने एकमताने संमत केला आहे. अण्णा भाऊंना भारतरत्न मिळावा, या मागणीसाठी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड राजू देसले यांनी दिली आहे.
लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती घेतल्यास त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे त्यांचे सर्व साहित्य तळगाळातील ‘नाही रे’ वर्गाला, महिला अन् दलित, आदिवासींना प्रेरणा देणारे आहे. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अतिशय महत्त्वाची भागीदारी केली आहे. शाहीर अमरशेख व शाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत अण्णा भाऊंनी आपल्या शाहिरीने मुंबईसह अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला आहे. साहित्याच्या क्षेत्रात अण्णा भाऊंनी जवळपास ३५ कादंबऱ्या, १३ कथासंग्रह, ३ नाटके, १४ लोकनाट्ये, १० पोवाडे, १ प्रवासवर्णन आणि कितीतरी शाहिरी कवने लिहून एक वेगळाच इतिहास घडविला आहे. त्यांच्या कादंबरी लेखनावर ७ मराठी चित्रपटही निघाले आहेत. शिक्षणाची परंपरा नसलेल्या, आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या मातंग समाजातील अण्णा भाऊंनी आपल्या भोवतालच्या अनुभवाच्या आणि प्रतिभेच्या सामर्थ्यावर दिलेले समाजासाठीचे योगदान लक्षात घेता, केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या १०१ व्या जयंती वर्षात भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, असा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने संमत केला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्राकडे याबाबत खंबीरपणे शिफारस करावी, अशी मागणीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी राजू देसले, जिल्हा सहसचिव दत्तू तुपे, शहर नाशिक सचिव महादेव खुडे, रविकांत शार्दूल, सुभाष गवारे, नितीन शिराळकर, राहुल अडांगळे, पद्माकर इंगळे, नितीन मते, विराज देवांग,  तलाह शेख, अविनाश दोंदे, अपूर्व इंगळे आदी उपस्थित होते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती ऑनलाइन साजरी

Next Post

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करावे

India Darpan

Next Post
Governor News 2 750x375 1

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करावे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011