नाशिक – राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने विविध बाबी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध अटी-शर्थींसह न्यायालये पूर्णवेळ सुरू करण्याची मागणी इंडियन असोसिएशन ऑफ लॉयर्स महाराष्ट्रच्या नाशिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. न्यायदान कक्षात पाच पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देऊ नये यासह अन्य अटी-शर्थी लागू करुन परवानगी देण्यात यावी. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून न्यायालये बंद असणे योग्य नाही. सर्वसामान्यांचा अधिकारही त्यामुळे बाजूला सारला जात आहे. तसेच, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा निपटाराही होणे अगत्याचे आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदनावर अॅड समीर शिंदे, अनिल हांडगे, एस यु सय्यद, नाझिम काझी, छाया कुलकर्णी, आर एन शिंदे, रुपेश मोरे, प्रभाकर वायचळी आदींची स्वाक्षरी आहे.