मनमाड – मनमाड पासून जवळच असलेल्या पानेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक दोन मध्ये एका उमेदवाराचे नावच ईव्हीएम मशीनमधून गायब झाले. स्थानिकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर हे नाव टाकण्यात आले. या गोंधळामुळे तब्बल पाऊण तास उशीराने मतदानाला सुरुवात झाली. या वार्डात तीन उमेदवार होते. पण, दोघांचे नाव त्यात होते. सदरची बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने मनमाड पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक पी.बी.गीते यांना कळवले. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ही माहिती नांदगावचे तहसीलदार यांना सांगितली. ते सुध्दा पानेवाडी येथे दाखल झाले व त्यांनी नवीन पेपर लावून मशीन सुरू करून दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.