मुंबई – वाचनाचे वेड सर्वानाच असते. गेल्या काही वर्षांपासून परदेशातही मराठी वाचकांचे प्रमाण वाढले आहे. यात कौतुकाची बाब म्हणजे यु. ए. ई. येथे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. याच धरतीवर ‘वाचक प्रेरणा दिना’च्या निमिताने सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्याशी खास ऑनलाईन भेट आयोजित करण्यात आली आहे. २३ ऑक्टोबरला हा कार्यक्रम फेसबुकवर आयोजित करण्यात आला आहे. जगभरातील वाचकांना एका तारेत जोडण्याचे काम या निमित्ताने होत आहे. ‘वाचक तितुका मेळवावा’ असे या कार्यक्रमाचे नाव असून संगणक, व्यवस्थापक, संगीत, विज्ञान, अर्थशास्त्र क्षेत्रात निपुण असलेले लेखक अच्युत गोडबोले यांच्याशी संवाद साधता येणार आहे. प्रथम पुस्तकाचे अभिवाचन नंतर मुलाखत व शेवटी वाचकांशी हितगुज अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत कार्यक्रम पाहता येणार आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी https://www.facebook.com/