इटानगर (अरुणाचल प्रदेश) – पूर्वी स्वतंत्र तिबेट प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या तवांग भूभागाला अरुणाचल प्रदेशात आणून भारताचा भाग बनवणाऱ्या अज्ञात नायक मेजर राले नगो बॉब खातींग यांच्या शौर्याचा ७० वर्षांनंतर प्रथमच सन्मान करण्यात आला आहे.
याप्रसंगी संरक्षणमंत्री जनरल बिपीन रावत, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा, केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू आणि अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडिअर (निवृत्त) बी.डी. मिश्रा उपस्थित मेजर खातींग यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
मणीपूरच्या तंगखुल नागा समाजात जन्मलेल्या मेजर खातींग यांनी १७ जानेवारी १९५१ रोजी तत्कालीन नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी (नेफा) चे सहाय्यक राजकीय अधिकारी या पदावर असताना तवांग भागाला रक्ताचा एक थेंबही न सांडता म्हणजे युध्द न करता शांततापूर्ण मार्गाने भारतीय ध्वजाखाली आणले होते. आसामचे तत्कालीन राज्यपाल जयरामदास दौलतराम यांच्या थेट आदेशानुसार मेजर खातींग यांनी आसाम रायफल्सच्या २०० जवानांसह हा पराक्रम केला होता.
त्यापूर्वी तवांग स्वतंत्र तिबेट प्रशासनाच्या अखत्यारीत होते, परंतु त्यांच्या या कार्य- कर्तृत्वाबद्दल नंतर मेजर खातींग यांना कोणी सन्मानित केले नाही. प्रशासकीय आणि सार्वजनिक जीवनातील कामगिरीवर आधारित ब्रिटिश सरकारच्यावतीने त्यावेळी पद्मश्री हा देशाचा चौथा सर्वोच्च सन्मान आणि ब्रिटीश साम्राज्याचा सदस्य म्हणून सन्मानित करण्यात आले.
असे असले तरी भारत सरकारकडून तवांगच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खातींग यांना फारसा सन्मान मिळाला नाही. परंतु शनिवारी मेजर खातींग यांचा मुलगा व सेवानिवृत्त आयआरएस अधिकारी जॉन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत मेजर बॉब खातींग यांच्या स्मारकाचा पाया रचण्यात आला.