नाशिक – येथे प्रस्तावित असलेले ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांच्या निवडी करण्यात आली आहे. येत्या २६, २७ व २८ मार्च रोजी हे संमेलन कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रागंणात होणे प्रस्तावित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक शहर परिसरात कोरोनामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ५० पेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास बंदी आहे. ही परिस्थिती लक्षात घेता संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.