नाशिक – कोरोनाचे सावट असल्याने सप्तशृंग गडावर यंदा तृतीयपंथीचा कोजागिरी पौर्णिमेचा छबिना उत्सव होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, अनेक वर्षांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून प्रशासनाने मोजक्याच तृतीयपंथीयांना गडावर देवीची छबिना काढण्याची परवानगी दिली. त्यानुसार गडावरील तलावापासून शुक्रवारी तृतीयपंथीयांनी वाजत गाजत देवीची छबिना मिरवणूक काढली. दरवर्षी मोठ्या संख्येने तृतीयपंथी सप्तशृंगी देवीच्या गडावर येऊन देवीचा जागर करीत असतात. महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे तृतीयपंथी गुरु त्यांच्या शिष्यांसह येथे येतात. छबिना उत्सवाद्वारे देवीचा जागर करीत असतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला लाखो भाविकांची दर्शनाला गर्दी होत असते. यंदा अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव संपन्न झाला.
बघा व्हिडिओ