शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधाच्या वेळी शिमला येथील शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आणि एका दिवसानंतर त्यांना सोडण्यात आले, त्यानंतर हरप्रीत यांनी हिराबेन मोदी यांना पत्रात लिहिले आहे की, देशाचे पंतप्रधान असलेले तुमचे पुत्र नरेंद्र मोदी हे तीन कृषी कायदे मागे घेतील, या आशेने मी तुम्हाला पत्र लिहित आहे. कारण कोणतीही व्यक्ती आपल्या आईचे म्हणणे टाळू शकत नाही, कारण भारतातील लोक आईला देव मानतात.
पंजाबातील मोलगाव येथील रहिवासी हरप्रीत यांनी एका खुल्या पत्रात लिहिले आहे, “प्रिय आई, आपल्या देशाचे पंतप्रधान तुमचा मुलगा आहेत आणि मला वाटते की तो तुम्हाला काही ‘नाही ‘ शकणार नाही. कृपया तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लीत धरणे आंदोलन करणारे हजारो शेतकर्यांना मदत करा. हरप्रीत सिंग यांनी पुढे लिहिले, हे पत्र मी मनापासून लिहित आहे, जसे तुम्हाला माहित असेलच की, तीन काळे कायद्यांमुळे कडक्या थंडीत देश आणि जगाला खाद्य देणारे अन्नदाता शेतकऱ्याला दिल्लीच्या रस्त्यावर झोपायला भाग पाडले जाते. ज्यामध्ये ९० ते ९५ वर्षाची वृद्ध माणसे १० ते १५ वर्ष वयाची मुले, मुले तसेच महिला आणि तरूण यांचा समावेश आहे. तिथल्या कडाक्याच्या थंडीमध्ये प्रत्येकजण आजारी पडतोय आणि मृत्यूमुखी देखील पडत आहेत, ही आमच्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. त्यांनी पुढे लिहिले की, मला खात्री आहे की, आपल्या मुलाला सांगून तुम्ही हे काळे कायदे परत घ्यायला भाग पाडाल. तसे झाले तर संपूर्ण देश आपले आभार मानेल. जर हे तीन कायदे रद्द झाले तर विजय संपूर्ण देशाचा असेल, कुणालाही पराभव पत्करावा लागणार नाही.