नवी दिल्ली – रेल्वेच्या सेवेतल्या ११ लाख ५८ हजार अराजपत्रित कर्मचाऱ्यांना २०१९-२० या वर्षाकरता त्यांच्या ७८ दिवसांच्या पगाराएवढा बोनस देणार असल्याचं रेल्वे मंत्रालयानं आज घोषित केलं. रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस येत्या दसऱ्यापूर्वी मिळणार असून ही रक्कम एकूण ८१ कोटी रुपये रुपये इतकी असल्याचं रेल्वेमंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित बोनस देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घोषित केला होता.