मुंबई – टाटा उद्योग समुहाचे प्रमुख रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याबद्दलच्या मागणीची ट्विटरवर सुरू असलेली मोहीम थांबवावी अशी विनंती त्यांच्या चाहत्यांनाृ केली आहे.
रतन टाटा यांच्या समाजकार्याबद्दल संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशवासीयांचे प्रेमही आहे. कोरोनाकाळात रतन टाटा यांच्या दानशूरपणाचा देशवासीयांनी अनुभव घेतला आहे. त्यांच्या कामाची यादी खूप मोठी आहे. एक उद्योगपतीच नव्हे तर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मोटिवेश्नल वक्ते डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी ट्विटरवर केली होती. त्यावर BharatRatnaForRatanTata असा हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला.
त्यावर प्रतिक्रिया देत रतन टाटा यांनी ट्विट करून लोकांचे आभार मानले. त्यांनी लिहिलं की, मला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मीडियावरून तुम्ही दाखलविलेल्या भावनांचा मी आदर करतो. पण एक विनंती करतो की, ही मोहीम थांबवा.मी भारतीय असल्याचं स्वतःला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे प्रयत्न व योगदान देत राहीन.
कर्मचाऱ्यांना अन् संस्थांनाही मदत
टाटा उद्योग समुह त्यांच्या कर्मचाऱ्यांची कुटुंबीयांप्रमाणे काळजी घेतो. कोरोनाकाळात त्यांनी कर्मचार्यांना पूर्ण पगार दिलेच शिवाय दिवाळीचा बोनसही दिला. मुंबई महापालिका आणि टाटा समुहातर्फे राबविलेल्या प्लाझ्मा थेरपी अभियानांतर्गत महापालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका आणि १० कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले आहेत.