मुंबई/नाशिक – विकासक आणि बांधकाम इच्छुकांसाठी सर्वसमावेशक बांधकाम नियमावली (युनीफाईड डीसीपीआर) प्रसिध्द झाली आहे. पार्कींंग, मार्जिनल स्पेस आणि अॅमेनीटी स्पेस या संदर्भात बांधकाम विकासकांबरोबरच नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या नियमावलीमुळे बांधकाम क्षेत्रालाही बूस्ट मिळणार आहे.
गेल्या काही दिवसापासून हा व्यवसाय वेगवेगळ्या अडचणीचा सामना करत आहे. या नियमावलीमुळे या व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या नियमावतील पार्किंगमध्ये मोठी सवलत तर रुग्णालये, शिक्षण संस्थानाही दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून या नियमावलीची बांधकाम व्यावसायिक वाट बघत होते. आज सकाळी ही नियमावली प्रसिध्द झाली. त्याचे सर्व बांधकाम व्यावसायिकांनी स्वागत केले आहे.