मुंबई – झी मराठी या मराठी टीव्ही वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका सुरू आहे. तरीही प्रेक्षकांचा प्रतिसाद तसूभरही कमी झालेला नाही. अखेर ही मालिका आता बंद होणार आहे. येत्या ७ मार्च रोजी या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित होणार आहे. येत्या ८ मार्चपासून घेतला वसा टाकू नको ही मालिका त्याजागी सुरू होणार आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1365588943912067073