नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. आतापर्यंत केंद्र सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यातील चर्चेच्या फेरी निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळेच आंदोलन सुरूच आहे. पंतप्रधान या आंदोलनाची दखल केव्हा घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर मोदींनी एक ट्विट आज सकाळीच केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पीयूष गोयल यांनी कृषी कायद्यांसंदर्भात माहिती दिली आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी हे सर्व ऐकावे’
मोदींचे ट्वीट असे
दोन्ही मंत्र्यांनी दिलेल्या माहितीचा व्हिडिओ असा
https://www.youtube.com/watch?v=on7Jh6iEQSc&feature=youtu.be