नाशिक – नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) मुख्यालय निमा हाऊस हे १४ दिवसांनंतर सुरू झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने हे कार्यालय १४ दिवस बंद ठेवण्यात आले होते. निर्जंतुकीकरण केल्यानंतर कार्यालय उघडण्यात आले आहे. दरम्यान, निमाच्या पदाधिकाऱ्यांसह दोन गटामधील वाद कायम आहे. सामंजस्याने तोडगा काढण्याबाबत उद्योजकांकडून रेटा लावला जात आहे. त्यात अद्याप यश आलेले नाही.