नवी दिल्ली – देशातील सर्वात जुना आणि मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडीबाबत अखेर ठरविण्यात आले आहे. काँग्रेस वर्कींग कमिटीची बैठक हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात अध्यक्ष निवडीबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या जून महिन्यात काँग्रेसचा नवीन अध्यक्ष निवडला जाणार आहे. तशी माहिती पक्षाचे नेते के सी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तत्कालिन अध्यक्ष राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे आली आहेत. तेव्हापासून अध्यक्षपद रिक्तच आहे. त्याची निवडणूक केव्हा होणार याची मोठी उत्सुकता सर्वांना आहे. अखेर आता जून महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1352549707365535748