मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुध्द बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेने अखेर आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यांनी तक्रार मागे घेत असतांना आपण कौटुंबिक व या प्रकरणात राजकारण होत असल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचे म्हटले आहे. ही तक्रार मागे घेतल्यामुळे मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.
काही दिवसापूर्वीच या महिलेने ट्विट करत म्हटले होते की, आपण सर्वांनीच एक निर्णय घ्या, आपण सर्वजण आणि जे मला ओळखतात त्यांनीही माझ्यावर वाईट आरोप करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ठरवून टाका. तुमच्या इच्छेनुसार मी माघार घेण्याचा निर्णय घेत आहे. यावेळी उद्विग्न होऊन शर्मा यांनी ट्विट केल्याचेही बोलले जात होते. पण, आज त्यांनी ही तक्रार मागे घेतली.
या महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर धनजंय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यांनी फेसबुकवरुन आपली बाजूही मांडली होती. पण, त्यांच्या विरुध्द झालेल्या तक्रारीमुळे विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. पण, राष्ट्रवादीने मुंडे यांना प्रकरणात दिलासा होता. आता तक्रार मागे घेतल्यानंतर त्यांना पुन्हा मोठा दिलासा मिळाला आहे.