मुंबई – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे व्हॅसअप, फेसबुकसह सोशल मीडियावर व्यस्त असतात. त्याद्वारे ते आपल्या चाहत्यांशी सतत संपर्कात असतात. ते काय ट्विट किंवा पोस्ट टाकतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, कवितेच्या पोस्टवरुन त्यांना आता माफी मागावी लागली आहे.
अमिताभ बच्चन हे त्यांच्या फोटोंसह काहीतरी लिहितात आणि सोशल मीडियावर टाकत असतात. तसेच वेळोवेळी त्यांचे दिवंगत वडील हरिवंश राय बच्चन आणि इतर कवींच्या कविता हे त्यावर टाकत असतात. अलीकडेच त्यांनी आपल्या फोटोसह सोशल मीडियावर एक कविता शेअर केली आहे, ज्यामध्ये ते चहा पिताना अतिशय आनंदी पवित्रामध्ये दिसत आहे. या ट्विटला 16 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. आणि हजारो लोकांनी यावर भाष्य केले आहे. यानंतर टीसा अग्रवाल नावाच्या महिलेनेही एक टिप्पणी केली होती. ती म्हणाली की, सदर कविता खरे तर तिनेच लिहिले आहे आणि त्याचे श्रेय तिला मिळाले पाहिजे, ती वादग्रस्त ठरलेली कविता अशी आहे….
थोड़ा पानी रंज का उबालिये l
खूब सारा दूध ख़ुशियों का I
थोड़ी पत्तियां ख़यालों की I
थोड़े गम को कूटकर बारीक I
हँसी की चीनी मिला दीजिये I
उबलने दीजिये ख़्वाबों को I
कुछ देर तक..!
यह ज़िंदगी की चाय है जनाब I
इसे तसल्ली के कप में छानकर
घूंट घूंट कर मज़ा लीजिये…!!
या कवितेवरून वाद झाल्याने अखेर बच्चन यांनी माफी मागितल्याने त्यांच्या या प्रतिसादाने त्या महिलेनेही लिहिले, आपल्या महानतेबद्दल धन्यवाद सर. मला तुमचे प्रेम पाहिजे होते, दिलगीरपणा नको. हा तुमचा आशीर्वाद आहे, जो आता माझा अभिमान आहे. यानंतर, अमिताभ बच्चन यांनी तो फोटो दुरुस्त करून रीट्वीट केला. त्यांनी लिहिले, या ट्विटचे श्रेय @ टिशा अग्रवाल यांना गेलेच पाहिजे. मला त्याचे मूळ कसे माहित नव्हते, कोणीतरी ते मला पाठविले, मला वाटलं की ते चांगले आहे आणि ते पोस्ट केले जावे. मात्र, यावेळी त्याने आपल्या ट्विटमध्ये चुकीच्या टिशालाही टॅग केले आहे. नुकताचे अमिताभ टीव्हीवर ‘कौन बनेगा करोडपती’ या नव्या सीझनमध्ये दिसले आहेत. आयुष्मान खुरानासोबतचा त्यांचा शेवटचा चित्रपट ‘गुलाबो-सीताबो’ होता. या चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
अनिताभ यांची पोस्ट अशी
https://twitter.com/SrBachchan/status/1343238769273569280