नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना अखेर चर्चेसाठी तयार झाल्या आहेत. ४० शेतकरी संघटनांची संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २९ डिसेंबरला कृती समितीचे प्रतिनिधी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहेत. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. केंद्र सरकारने वारंवार चर्चेचा प्रस्ताव ठेवला. कायदे मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे हा तिढा अद्याप सुटलेला नाही. परिणामी, दिल्लीकडे येणाऱ्या विविध महामार्गांवर शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. मात्र, आता सरकार आणि शेतकरी यांच्यात चर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.