नवी दिल्ली – कृषी कायद्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी अखेर ट्रॅक्टर परेडसाठी परवानगी दिली आहे. शेतकऱअयांना दिल्लीच्या बाह्य रिंगरोडवर एकत्रित मोर्चा करायचा होता. मात्र, दिल्लीतील अंतर्गत रस्त्यावर मर्यादित प्रवेश देण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व सीमांवर ट्रॅक्टर एकत्र येणार नाही. जिथवर पोलिसांनी परवानगी दिली आहे तिथवर ट्रॅक्टर जाणार आहेत. तसेच, तेथून ते माघारी फिरणार आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेड करण्याचे शेतकरी आंदोलकांनी जाहिर केले होते. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी अर्ज केला होता. त्यास परवानगी मिळणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर पोलिसांनी अटी-शर्थींसह परवानगी दिली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची ट्रॅक्टर परेड होणार आहे. परेडच्या मार्गासह अन्य बाबींवर अंतिम निर्णय रविवारच्या बैठकीत होणार आहे.