वॉशिंग्टन – संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे विजयी झाले आहेत. ते अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. बहुमतासाठी लागणारे २७० एवढी मते त्यांनी मिळविली आहेत. अन्य राज्यातील मतमोजणी सुरूच राहणार आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. बायडेन यांच्या विजयाची घोषणा होताच संपूर्ण अमेरिकेत ठिकठिकाणी प्रचंड जल्लोष सुरू झाला आहे. या निकालामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा सत्तांतर झाले आहे.
(यासंबंधीचे आणखी वृत्त)
- असे आहेत जो बायडेन; तिसऱ्या प्रयत्नात मिळाले अध्यक्षपद
https://indiadarpanlive.com/?p=15202
- कमला हॅरिस यांनी रचला इतिहास; पहिल्या भारतीय वंशाच्या महिला
https://indiadarpanlive.com/?p=15210
- नवी अमेरिकन क्रांती – लेख
https://indiadarpanlive.com/?p=15292