नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा आगामी भारत दौरा रद्द केला आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजेच २६ जानेवारीला ते प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार होते. तसे निमंत्रण मोदी यांनीच दिले होते. ते त्यांनी स्विकारले होते. ब्रिटन पंतप्रधान कार्यालयाने तसे जाहिरही केले होते. मात्र, कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रकोप ब्रिटनमध्ये वाढला आहे. सद्यस्थितीत तेथे फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ब्रिटनमधील ही परिस्थिती लक्षात घेऊन जॉन्सन यांचे निमंत्रण रद्द करावे, अशी मागणी काँग्रेससह अन्य पक्षाच्या नेत्यांनी केली होती. मात्र, आता ब्रिटननेच हा दौरा रद्द केला आहे.