नाशिक – कोरोचा वाढता प्रादुर्भाव पाहता जेईईच्या परीक्षा घेवू नये असा विरोध सर्वस्तरावर होत असतांना अखेरीस आज (२ सप्टेंबर) परीक्षेचा श्रीगणेशा झाला. राज्यातील नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर शासनाच्या नियमांचे पालन करत परीक्षेला सुरुवात झाली. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात केंद्रांच्या क्षमतेप्रमाणे परीक्षा घेतल्या जात आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जेईईच्या परीक्षा घेण्यासंबंधी मार्गदर्शक सूची जाहीर करण्यात आली. त्यानुसार राज्यातील केंद्रांवर परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळल असल्याचे यावेळी दिसून आले. सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षाकेंद्रांवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. थर्मल डिटेक्टरद्वारे विद्यार्थ्यांचे टेम्परेचर मोजून केंद्रावर प्रवेश देण्यात आला. यावेळी परीक्षा यंत्रणेतर्फे विद्यार्थ्यांना मास्क देण्यात आले. शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन परीक्षा केंद्रांवर होत असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आखून दिलेल्या नियमांच्या आधारे कार्यप्रणाली राबवण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना, वैद्यकीय पथक यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होवू नये असा पवित्रा अनेकांनी घेतला होता. मात्र कोर्टाच्या आदेशानुसार परीक्षा घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.
—
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुविधा करून देण्यात आली आहे. शासनातर्फे विद्यार्थ्यांना मास्क पुरवण्यात आले. सोशल दिसतानसिंग राहून परीक्षा दिल्याचे समाधान आहे.
– मानस येवले, विद्यार्थी