बिजींग – अखेर जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनच्या वुहान शहरात दाखल झाले आहे. या पथकाला चीनकडून परवानगी दिली जात नव्हती. ही बाब जागतिक पातळीवर चर्चेची ठरली. अखेर चीनला परवानगी द्यावी लागली. वुहानमधूनच कोरोनाचा प्रसार कसा झाला आणि तेथे हा विषाणू कुठून व कसा आला याचा तपास हे पथक करणार आहे.
चीनच्या वुहान शहराचे नगराध्यक्ष झो शिनवांग यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वुहान या शहरातून २०१९ च्या अखेरीस कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि नंतर तो जगभर पसरला. अखेर दिर्घ काळानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने संपूर्ण सत्यता शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
वुहानचे महापौर झोऊ यांनी कोरोना संसर्गाची माहिती लपविली होती. वुहानमध्ये संपूर्ण लॉकडाऊन २०१९ वर्ष पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी करण्यात आला. त्यानंतर वुहानमधील कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी २३ जानेवारी रोजी सर्व काही बंद झाले होते. सरकारी संस्था लोकांना घरांमध्ये आवश्यक वस्तू पुरवत होते. तसेच कोरोना संसर्गाची माहिती दिर्घ काळासाठी लपवून ठेवल्यामुळे कोरोना अनियंत्रित झाला होता. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासणीत बर्याच गोष्टी उघडकीस येऊ शकतात. यापूर्वीही कोरोनाशी संबंधित माहिती लपवली गेली होती आणि वुहानमध्ये राहणाऱ्या लोकांना परदेशी माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली गेली होती.