जळगाव – भाजपला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खडसे यांनीही दुजोरा दिला आहे. शुक्रवारी या संर्दभात बातम्या सर्वत्र आल्यानंतर खडसे यांनी मला अद्याप नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. पण, आज त्यांनी ही नोटीस मिळाल्याचा खुलासा केला आहे.
ही नोटीस मिळाल्यानंतर खडसे यांनी सांगितले की, मला ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा झाल्यानंतर राज्यभरातून फोन आले. त्यात सहानुभूती व्यक्त केली. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाही असेही त्यांनी सांगितले. ३० डिसेंबर रोजी खडसे यांना चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे.