मुंबई – अभिनेत्री कियारा अडवाणीने अखेर मोठा खुलासा केला आहे. तिच्या रिलेशनशीपबाबत सध्या विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ती कुणाबरोबर डेट करत आहे याचेही मोठे गॉसिप तिच्या चाहत्यांसह बॉलिवूडमध्ये आहे. अखेर कियाराने स्पष्ट केले आहे की, ती कुणाबरोबर डेट करीत आहे. सोशल मिडियात ती अधिक सक्रीय राहते. यातूनच ती चाहत्यांसाठी विविध फोटो, पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करीत असते. कियाराने म्हटले आहे की, ती सध्या सिद्धार्थ मल्होत्रा सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच ती सिद्धार्थ सोबत हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी गेली होती. तेव्हापासून चर्चांना अधिक वेग आला होता. अखेर तिनेच खुलासा करुन चित्र स्पष्ट केले आहे.