मुंबई – ‘ड्रीम ११’ या ऑनलाईन स्पोर्ट्स फँटसी कंपनीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे प्रायोजकत्व मिळविले आहे. ‘ड्रीम ११’ ही कंपनी यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआयला २२२ कोटी रुपये देणार आहे. हा करार येत्या डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे सुमारे साडेचार महिन्यांचा असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे. याआधी ‘विवो’ या चिनी मोबाईल कंपनी बरोबरचा प्रायोजकत्वाचा करार रद्द झाला होता. यंदाची आयपीएल स्पर्धा येत्या १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीत होणार आहे.