मुंबई – ऑनलाईन शिक्षणाचे मोठे आव्हान असतानाच कोरोनाच्या कार्यातही शिक्षकांना सामावून घेतल्याने राज्यभरात त्याचे पडसाद उमटत होते. अखेर शिक्षकांची कोरोना कामातून मुक्तता करण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. पण, शिक्षकाला कोरोना कामातून कार्यमुक्त करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. याबाबत शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात जिल्हा परिषदेचे साडेतीन लाख, खासगी शिक्षण संस्थांचे साडेतीन लाख आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे दीड लाख शिक्षक आहेत. यातील बहुतांश शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केलेल्या आहेत.
केवळ आदेश काढून सरकारने बोळवण केली आहे, असा आरोप शिक्षक संघटनांनी केली आहे. कोरोना कामातून पूर्णपणे मुक्ती देण्याची मागणी अद्यापही कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.