नवी दिल्ली – पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अखेर दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे गोस्वामी यांची दिवाळी तुरुंगाऐवजी घरी होणार आहे. गोस्वामी यांच्यावतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी गोस्वामी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे.