सोमनाथ पवार, पिंपळगाव
परिचय-
चांदवड तालुक्यातील उसवाड गावचे कवी सोमनाथ पवार यांचा २०१३ साली पोशिंदा हा काव्य संग्रह प्रकाशित झाला .त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. कवीचं बालपण खेडेगावात गेल्यामुळे शेतीची कामेही करावी लागली. नोकरीच्या निमित्ताने गाव सुटलं, पण शेतीमातीशी जोडलेली नाळ आजही तशीच घट्ट आहे. बालपणातच कवीचं पितृछत्र हरपलं आणि संसाराचा सारा भार आईवर पडला. पण, आईने तो सारा भार सोसवत संसाराचा गाडा ओढला. त्या आईची महत्ती कवीने ‘आई’या कवितेतून व्यक्त केल आहे.
कवी सोमनाथ पवार यांच्या ‘आई’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
-विष्णू थोरे, चांदवड