सुनील कालीदास जवंजाळ
मु.पो.चोपडी, ता.सांगोला जि.सोलापुर -४१३३०८
….
परिचय-
• वेदनेच्या पाऊलखुणा हा कवितासंग्रह १५ ऑगस्ट २०१६ रोजी संस्थाअध्यक्ष प्रा.पी.सी.झपके , लोककवी प्रशांत मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते चोपडी येथे प्रकाशित . • या कवितासंग्रहास १ ) राज्यस्तरीय ग.दि.मा.शब्दसृष्टी पुरस्कार पुणे . ( भोसरी ) २ ) राज्यस्तरीय मेघदुत काव्य पुरस्कार बार्शी ३ ) स्व.बाबासाहेब नारखेडे राज्य पुरस्कार भुसावळ जि.जळगाव ४ ) मराठी अध्यापक मंडळ सातारा येथील राज्य पुरस्कार ) माणवेश गौरव पुरस्कार पाचेगाव खु.ता.सांगोला ) भोसे ता.पंढरपुर येथे युवा साहित्य गौरव पुरस्कार ७ ) सारस्वत गौरव पुरस्कार शेटफळे ता.मोहोळ ) अक्षरज्योत साहित्य पुरस्कार पंढरपुर शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार , चाळकवाडी जुन्नर , १० ) कवी ज्ञानेश्वर कोळी राज्यस्तरीय काव्य पुरस्कार पलुस , ११ ) सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ चोपडी यांच्यावतीने उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार.इत्यादी पुरस्कार मिळालेले आहेत .
• सद्या महाराष्ट्रात गाजत असलेली काळीजकाटा या कादंबरीचे ३ फेब्रुवारी २०१८ रोजी धनश्याम पाटील यांच्या चपराक प्रकाशन पुणे कडुन प्रकाशित व दुसरी आवृत्ती मुंबई येथे २७ फेब्रुवारी २०१७ ला प्रकाशित . • या कादंबरीला म.सा.प.पुणे येथील ग.ल.ठोकळ उत्कृष्ठ ग्रामीण साहित्य पुरस्कार -२६ मे २०१८ रोजी प्रधान • २०१८ चा मनोरमा साहित्य पुरस्कार सोलापुर काळीजकाटा या कादंबरीला प्रधान • काळीजकाटा कादंबरीला म.सा.प.शाखा दामाजीनगर ( मंगळवेढा ) व ध्यास फाऊंडेशन पलुच येथील उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्रधान • गेली बारा वर्षापासुन दै.पुढारी मध्ये पत्रकार म्हणुन विविध सामाजिक समस्यांची वृत्तपत्रातुन मांडणी . तुळजाभवानी नवरात्र मंडळ जुनोनी व दै.सांगोला नगरीचा आदर्श पत्रकार पुरस्कार .
• कलर्स मराठी या वाहिनीवर साहित्य दरबार , हास्यरंग या कार्यक्रमात कवितांचे सादरीकरण .
• महाराष्ट्रातील विविध व्याख्यानमालेत सहभाग व महाविद्यालय , डी.एड. , बी.एड , विविध प्रशालेतुन १०० च्या वरती विविध विषयांवर व्याख्यान . व विविध महाविद्यालयात स्नेहसंमलनात प्रमुख पाहुणा म्हणुन उपस्थिती .
• ग्रामिण भागातील कविसंमेलनात उत्कृष्ठ सुत्रसंवादक म्हणुन सर्वत्र परिचय.व राज्यातील अनेक ठिकाणी निमंत्रीत कवी म्हणुन सहभाग .
• सोलापुर , सांगली , उस्मानाबाद आकाशवाणीवरती काव्यवाचनाचे कार्यका सावर तर रेडीओ सिटीवर मुलाखत .
• चोपडी येथील जय शिवराय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा सक्रीय सदस्य .
• दै.एकमत लातुर येथुन प्रसिध्द होणाऱ्या सप्तरंग या पुरवणीतुन पुस्तक परिक्षण .
• स्वर्गीय हरिश्चंद्र फाऊंडेशनच्या वतीने काळीजकाटा कादंबरीला साहित्य दर्पण सन्मान २०११
कवी सुनील जवंजाळ यांच्या ‘कुबेराचं धन’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
-विष्णू थोरे,चांदवड.