किरण विश्वनाथ भावसार
मुळगावः वडांगळी, तालुका सिन्नर
शिक्षणः एम ए, मराठी वाङमय
नोकरीः सिन्नर येथे ॲडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीत परचेस एक्झिक्यूटिव्ह या पदावर कार्यरत
मोबाईल नंबर- ७५८८८३३५६२
…….
परिचय-
प्रकाशित पुस्तके, पुरस्कार:
– २०११ मध्ये मुळांवरची माती सांभाळताना हा कवितासंग्रह प्रकाशित.
या कवितासंग्रहाला कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील मानाचा विशाखा काव्यपुरस्कार तसेच संगमनेर येथील इतिहास संशोधक मंडळातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कवी अनंत फंदी साहित्य पुरस्कार
– गिरणा गौरव प्रतिष्ठानचा स्मिता पाटील शब्दपेरा काव्य पुरस्कार
– सावाना नाशिकचा कवी गोविंद काव्य पुरस्कार (प्रथम क्रमांक)
– जानेवारी २०१९ मध्ये स्वप्नवेड्या पंखांसाठी हा बालकविता संग्रह प्रकाशित तसेच ५ सप्टेंबर २०१९ ला इरिंग मिरींग बालकविता संग्रहाचे प्रकाशन.
– स्वप्नवेड्या पंखांसाठी या पुस्तकातील अदलाबदल कवितेचा इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमात समावेश
– स्वप्नवेडया पंखांसाठी या बालकाव्यसंग्रहास गारगोटी, जि. कोल्हापुर येथील अक्षरसागर साहित्य पुरस्कार -२०२०
– स्वप्नवेडया पंखांसाठी या बालकाव्यसंग्रहास कोल्हापुर जिल्ह्यातील मिनचे खुर्द, ता. भुदरगड येथील साहित्य गौरव समितीच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय प्रेरणा साहित्य पुरस्कार -२०२०
– इरिंग मिरिंग या बालकविता संग्रहाला नांदेड जिल्ह्यातील, नायगाव येथील मातोश्री कै. सौ. केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार -२०२०
– बालसाहित्यातील योगदानासाठी जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाकडून दिला जाणारा सौ.लीलाबाई दलिचंद जैन सूर्योदय बालसाहित्य पुरस्कार-२०२०
– अदलाबदल या कवितेचा हिंदी , इंग्रजी, सिंधी, बंगाली, तामिळ, उर्दू आदी दहा भारतीय भाषांमधील अनुवाददेखील बालभारतीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट.
– आठवणींची भरता शाळा आणि शनीखालची चिंच हे दोन ललित लेख संग्रह ई-बुक स्वरूपात प्रकाशित.
– कोल्हापुर येथील बालकुमार साहित्य सभेचा ईबुकसाठी दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ठ वाङ्मयनिर्मिती पुरस्कार – – आठवणींची भरता शाळा या ईबुकला प्रदान.
– आपडी थापडी बालकविता संग्रह जानेवारी २०२० मध्ये प्रकाशित.
– गावकारभारी-चरित्र ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर
– मित्राची गोष्ट -किशोर कादंबरी प्रकाशनाधीन
सामाजिक कार्यः
१९९५ मध्ये वडांगळी येथे दिग्विजय कला, क्रीडा, साहित्य केंद्र या संस्थेची स्थापना; आजवर संस्थापक उपाध्यक्ष
१९९५ मध्येच वडांगळी येथे दिग्विजय सार्वजनिक वाचनालयाची स्थापना; वाचनालयाचा संस्थापक उपाध्यक्ष
मेंढी तालुका सिन्नर येथील मधुकर केरू गिते फाउंडेशन संचलित नवोदय ग्रामीण निवासी व्यसनमुक्ती केंद्राचा उपाध्यक्ष
कामगार शक्ती फाउंडेशन या कामगारांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविणाऱ्या संस्थेचा मार्गदर्शक संचालक
महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नर शाखेचा उपाध्यक्ष
पत्रकारिताः
सुमारे बारा वर्षाहून अधिककाळ सकाळ, लोकमत, तरुण भारत आदी दैनिकांतून पत्रकारिता
विविध वृत्तपत्रे मासिके साप्ताहिके दिवाळी अंक यातून कथा कविता ललित लेख, बालसाहित्य, वैचारिक लेखन प्रसिद्ध.
जळगाव आणि नाशिक आकाशवाणीवरून कविता वाचन तसेच भाषणांचे कार्यक्रम.
नासिक आकाशवाणीवर गोदा तरंग कार्यक्रमात वाचता-वाचता या सदरासाठी दोन वर्ष लेखन.
दैनिक देशदूत वृत्तपत्रातून दोन वर्ष नाशिक कट्टा या सदरात ललित लेखन.
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वर्गीय प्रकाश शेठ शहा स्मृती पुरस्काराने सन्मान.
– महाराष्ट्र शासनाचा सन २००० सालाचा प्रथम कर्तबगार कामगार पुरस्कार
सन २०१३ मध्ये महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार
तरल संवेदना आपल्या कवितेतून मांडणाऱ्या कवी किरण भावसार यांच्या ‘जगण्याचा चारा’ या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड