मोबाईल- ९८६०१६७६६२ / ९१५६०७७०९७
परिचय-
– व्यवसाय: शेती व शेतमजुरी
– छंद : शाहिरी कला , सामाजिक कार्य , हार्मोनियम वादन , पोवाडे लेखन गित लेखन , नाट्य लेखन , गायन , अभिनय आदी.
– संस्थापक अध्यक्ष: खान्देश लोकरंग फाऊंडेशन , नगरदेवळा , ता.पाचोरा जि.जळगाव
– जिल्हाध्यक्ष : महाराष्ट्र शाहीर परिषद , पुणे – शाखा जळगाव
– शाहिरी व सामाजिक कार्याची सुरुवात : इ.स. १९७१ पासून
स्वलिखित व सादर केलेली नाटके : १ ) जुलूम , २ ) मायेचा संसार , ३ ) पुढारी भोळा लफडी सोळा , ४ ) दाजीबाचं कारट ५ ) सरपंच खूनी पाटील बेईमानी ६ ) पापाचा भरला घडा ७ ) बेरडाची औलाद ८ ) चला भाऊ गाळा खाऊ – सदर नाटकांचे खान्देश तसेच राज्यभर असंख्य प्रयोग सादर .
शाहिरी लेखन भाषा : मराठी , हिंदी व अहिराणी
महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमात सहभाग : जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, पर्यावरण प्रबोधन, सांस्कृतिक विभागातर्फे शाहिरी महोत्सवात सहभाग तसेच बाल शाहिरी प्रशिक्षणातील शिबिर प्रशिक्षक, शाहु – फुले आंबेडकर जागृती अभियान, भ्रूण हत्या जागृती अभियान, पाणलोट अभियान, ग्राम स्वच्छता अभियान , जाणीव जागृती अभियान, एड्स व बाल आरोग्य अभियान आदी उपक्रमात सातत्याने सहभाग .
गीत लेखन विषय: युग पुरूष , संत , समाजसेवकांचे पोवाडे , भारूड , गोंधळ , हुंडा बंदी , दारू बंदी , व्यसनमुक्ती , एड्स बंदी , कारगील गीत . हुतात्मा गीत , ग्रामीण लोक गीत , लोक शिक्षण गीत , पर्यावरण , हगणदारी मुक्त गाव , ग्राम स्वच्छता , अंधश्रद्धा निर्मुलन , आदी विषयांबर प्रबोधनात्मक हजारो पोवाडे गीत लेखन .
प्रकाशित व्हीसीडी कॅसेट: धोड्यांदं लगीन , गँगन रे ( प्रबोधनात्मक अहिराणी कॅसेट ) प्रस्तुती निसर्ग व्हिडीओ कंपनी , नगरदेवळा
नियमित कार्यरत उपक्रम: १ ) राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा अभियान , २ ) ही रात्र शाहिरांची ३ ) जागर पर्यावरणाचा , ४ ) रंग शाहिरी कलेचा , ५ ) संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान , ६ ) व्यसन मुक्त पहाट अभियान , ७ ) एड्स जनजागृती अभियान , ८ ) भ्रूण हत्या जागृती अभियान , ८ ) फुले आंबेडकर जागृती अभियान , ९ ) राष्ट्रीय युगपुरूषांची जयंती – पुण्यतिथी , १० ) राष्ट्रीय व धार्मिक सणानिमीत्त प्रभात फेरी ११ ) कामगार कला गौरव सोहळा तसेच विविध शाहिरी कार्यक्रम व मेळाव्यांचे सातत्याने आयोजन .
रसिकांच्या कौतुकास पात्र ठरलेले पोवाडे : छत्रपती शिवरायांचा पोवाडा , संत तुकारामांचा पोवाडा , राणी लक्ष्मीबाईंचा पोवाडा , राजर्षी शाहू महाराजांचा पोवाडा , महाराणा प्रतापांचा पोवाडा , गांधी – फुले – आंबेडकरांचा पोवाडा , महाराष्ट्राचा पोवाडा , बहिणाबाई चौधरींचा पोवाडा , शिरीष कुमारांचा पोवाडा , भृणहत्येचा पोवाडा , पर्यावरणाचा पोवाडा , व खान्देश पोवाड्यासह इतर अहिराणी , मराठी व हिंदी गीते .
राज्यभर केलेल्या कार्यक्रमाचे ठिकाण: मुंबई दुरदर्शन ( सह्याद्री वाहिनी ) , स्टार माझा , आकाशवाणी जळगाव केंद्र , तसेच पुणे , मुंबई , नागपूर , बुलढाणा , खामगाव , धुळे , औरंगाबाद , जळगाव नंदूरबार , कोल्हापूर , सांगली , जालना , नाशिक , चाळीसगाव व संपूर्ण खान्देश सह संपूर्ण महाराष्ट्रात .
विविध संस्थाकडून आजवर मिळालेले सन्मान व पुरस्कार : १ ) राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार ( सामाजिक न्याय विभाग , महाराष्ट्र शासन २०१३-१४ – नागपूर ) २ ) राज्य सांस्कृतिक पुरस्कार ( सांस्कृतिक कार्यसंचालनालय , महाराष्ट्र शासन २०१७-१८ – मुंबई ) ३ ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण ( दलित मित्र ) पुरस्कार ( सामाजिक न्याय विभाग , महाराष्ट्र शासन २०१७-१८ – नागपूर ) ४ ) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार , औरंगाबाद ५ ) ज्ञानप्रबोधन पुरस्कार , साळंबी , पुणे ६ ) आद्यकवी महर्षी वाल्मीक पुरस्कार , जळगाव ७ ) शाहीरी गौरव पुरस्कार , माळी महासंघ , जळगाव ८ ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार , जळगाव ९ ) शाहीर योगेश स्मृतीगंध पुरस्कार , पुणे.
शाहीर शिवाजीराव पाटील यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्र गीत’ आपल्यासाठी ….
-विष्णू थोरे,चांदवड