शिंदे (भयाळे) ता.चांदवड
परिचय-
मूळच्या चांदवड तालुक्यातील असलेल्या सौ.वैशाली जाधव शिंदे या पेशाने शिक्षिका आहेत. जवळ जवळ २४ वर्ष शिक्षकीपेशात काम करून वाचन ,लेखन हा छंद त्यांनी जोपासला आहे. मराठी शिलेदार समूहाच्या त्या सभासद असून चंद्रपूर येथील गुरुगौरव पुरस्कारानेही त्या सन्मानित आहेत. एक उपक्रमशिल शिक्षिका व कवयित्री म्हणुन त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक काव्यसमेलनातून त्यांचा सातत्याने सहभाग असून त्यांचा ‘कलाटणी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून लवकरच नवीन काव्यसंग्रह व कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. निसर्गा विषयीच्या तरल जाणिवा लिहिणाऱ्या कवियत्री सौ. वैशाली जाधव-शिंदे यांच्या ‘वन वेळूचे हिरवे’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
–विष्णू थोरे,चांदवड.