…..
परिचय-
– कवी,लेखक,भाषा अभ्यासक.
– शिक्षण : एम.ए.बी.एड.जेआरएफ,नेट,सेट : मराठी
मराठी कवितेत पीएचडी सुरू (मुंबई विद्यापीठ)
– व्यवसाय : शिक्षिका
वृषाली विनायक यांनी स्त्रीजाणीवेच्या कवितांनी मराठी कवितेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. तंत्रज्ञान पिढीचे प्रतिनिधित्व त्यांच्या कवितेत जसे आहे तसेच साहित्यिक उपक्रमशीलतेतही आहे. कवितेकडे गांभीर्याने बघणारी ही कवयित्री स्वतःच्या कवितेबाबतही तितकीच काटेकोर आहे. नवनव्या प्रतिमांमधून आपल्या अनुभवविश्वाची काव्यात्म मांडणी वृषाली विनायक करतात. त्यांच्या कवितेतील अनुभवविश्व थेट भिडणारे आहे. बेगडीपण, कृत्रिमता त्यांच्या कवितेला मानवत नाही. अनुभवाचा स्पष्ट उद्गार वृषाली विनायक यांची कविता करते. षाली विनायक यांचा साहित्य क्षेत्रातला वावर जसा प्रभावित करणारा आहे. तसेच वृषाली विनायक यांचे सामाजिक भानही अधोरेखित आहे. समाजातली प्रत्येक घटना बारकाईने टिपत आपल्या लेखणीने त्याचा उहापोह त्या करतात.
प्रकाशित साहित्य :
– लोकसत्ता : चतुरंग, पुढारी, वार्तादीप वर्तमानपत्रे
– अक्षर वाङ्मय, अक्षरपेरणी, आपले वाङ्मय वृत्त, संभाषित, अक्षर प्रबोधन, साहित्य संवेदन, रणांगण, रानफूल इ. नियतकालिके.
– मॅक्स महाराष्ट्र, कायद्याने वागा लोकचळवळ वेबसाईट इ.
– चित्रलेखा या नियतकालीकात वृषाली विनायक यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख प्रसिद्ध झाला आहे.
– वृषाली विनायक यांच्या काही निवडक मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.
संपादन :
– साहित्य संवेदन – २०१७ (मराठी भाषा दिन विशेषांक)
– मास्तर : नारायण सुर्वे विशेषांक (संपादकीय सदस्य)
– संचालक : बोरूची शाळा – बोरूची शाळा या भाषिक कौशल्य विकसनाचा अभ्यासक्रम बनवला आहे.
– राज्य शासनाच्या ग्रंथ महोत्सवात या अभ्यासक्रमाधारीत शिक्षकांसाठी संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते.- – – – — राज्यस्तरीय कविसंमेलन, परिसंवाद, चर्चासत्रे यांत निमंत्रित कवी, वक्ता म्हणून सहभाग.
– साम मराठी वाहिनीवर ‘लेडीज स्पेशल’ चर्चासत्रात सहभाग.
– महाराष्ट्रातील नामवंत कवी/लेखक यांचा सहभाग असलेल्या झिम्माड महोत्सवाचे सलग तीन वर्षे यशस्वी आयोजन.
– महाराष्ट्र शासन कार्यसंचालनालय आयोजित गदिमा, पु.ल.देशपांडे, बाबुजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लेखन कार्यशाळेत विषयतज्ज्ञ म्हणून सहभाग.
– बोलू कवतिके या मुलाखत वेब सिरीजच्या माध्यमातून मराठीत अक्षरठसा उमटविणाऱ्यां मान्यवर साहित्यिकांचे दस्तावेजीकरण करण्याचे काम सुरू आहे.पुरस्कार :
– सावित्री पुरस्कार, कायद्याने वागा लोकचळवळ
– सावित्री पुरस्कार, अशोका फाऊंडेशन
– सावित्री पुरस्कार, अवंतिका फाऊंडेशन
– मराठीभूषण, विद्यार्थी भारती
– साहित्यभूषण, मनोरमा प्रतिष्ठान
-विष्णू थोरे,चांदवड