परिचय-
– नांदेड मध्ये जिजामाता इंग्रजी प्राईमरी स्कूल ची मुख्याध्यापिका म्हणून सध्या कार्यरत
( शाळेत सह शिक्षिका म्हणून 7 वर्षांचा अनुभव)
– वादविवाद, वक्तृत्व स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिकं
– फिल्म/शॉर्ट फिल्म मध्ये गीत लेखन
– विविध शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय
– मराठी चित्रपटात भूमिका
– मॉडेलिंग/जाहिरातीचा अनुभव
– विविध वर्तमानपत्रात कविता लेख छापून
– अनेक कविसंमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून हजेरी
– स्त्री प्रबोधन, सामाजिक विषयवार व्याख्याता म्हणून प्रतिष्ठा
– कविता संग्रह,कथा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.
शब्दांशी सलगी आहेच, अभिनयाचा पिंडही आहे. हे दोन्ही सोबत असले की कविता भक्कम होते.नेमकी पोहचवता येते. मुळात लय,गेयता आणि विद्रोह या सर्व विजया गायकवाड यांच्या कवितेच्या जमेच्या बाजू आहेत.आतली घालमेल संकोच न बाळगता त्यांच्या कवितेतून व्यक्त होते तेव्हा ती वास्तवाशी आपले नाते सांगते. निसर्गाशीही ती एकरूप होते. त्यांच्या ‘दव थेंबांची शाळा’ या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड