लोककवी प्रा.प्रशांत मोरे
मालेगाव / कल्याण
…..
परिचय–
कल्याणच्या के.एम .अग्रवाल माहाविद्यालयात मराठी या विषयाचे अध्यापन करणारे लोकप्रिय कवी प्रशांत मोरे हे मूळचे नाशिक जिल्हातील मालेगाव येथील असून मालेगाव मध्ये प्राण या नावाने परिचित आहेत. ते मालेगावचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे जीव की प्राण आहेत असे कवी विठ्ठल वाघ म्हणतात. माय अर्थात आईच्या कवितांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या पहाडी आवाजात कवी प्रशांत मोरे यांनी कवितेचे शेकडो कार्यक्रम करून कवितेला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. कवितेला जनमानसात नेऊन कवितेचे असंख्य कान तयार केले आहे.
प्रकाशित काव्यसंग्रह-
– कबिराराचे देणे
– वेदना सातारकर हजर सर!
– ही वस्ती सस्ती हाय पोरा
– माय अर्थात आईच्या कविता खंड१
– माय अर्थात आईच्या कविता खंड२
– अभिवादन बा भीमा!
– जळत्या दशकाचे वर्तमान
– समजो पीर पराई(अनुवाद)
हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध झाले असून ,
पुरस्कार-
– गदिमा पुरस्कार,
– प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार,
– आद्यकवी मुकुंदराज साहित्य पुरस्कार,
– यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार,
– मुंबई दूरदर्शन पुरस्कृत संत ज्ञानेश्वर पुरस्कार,
– नारायण सुर्वे पुरस्कार
असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
ईटीव्ही,सामटीव्ही,झी मराठी, लोकमत आयबीएन, दूरदर्शन वर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.
मैना ही त्यांनी गायलेली गाजलेली प्रेम कविता लवकरच स्पर्श या चित्रपटात गीत रूपाने येत असून कवी प्रशांत मोरे यांनी अनेक गीतांना सांगीतबद्ध कले आहे. माय अर्थात आईच्या कविता हा शब्द गीतांचा अल्बमही प्रसिद्ध आहे.
पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्याच्या कवितेचा समावेश आहे. त्यांच्या “देह झाला पाणवठा” या कवितेचे अक्षरचित्र खास आपल्यासाठी…
-विष्णू थोरे,चांदवड
क्या बात है
खूप छान सर ????????????????
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ????????