रवींद्र मालुंजकर यांचा परिचय
नाशिक तालुक्यातील पळसे साखर कारखाना माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून १९९४ पासून कार्यरत. शिक्षक आणि कवी याशिवाय खुमासदार सूत्रसंचालक म्हणून संपूर्ण जिल्ह्याला ओळख. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत रसिकप्रिय झालेल्या ‘कवितेची पाऊलवाट’ या काव्यमैफलीचा प्रमुख सूत्रसंचालक. ‘लग्नाची गाणी ते आजची कविता’, ‘आई माझा गुरू’, ‘युवकांनो तुमच्यासाठी…’, ‘कविता जगवा; कविता जागवा’ यांसह विविध विषयांवर राज्यभरातील विद्यालये, महाविद्यालयांसह अनेक ठिकाणी अभ्यासपूर्ण व्याख्याने.
महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या अग्रगण्य संस्थेच्या उपक्रमशील नाशिकरोड शाखेचा कार्यवाह. नाशिक ग्रामीण साहित्य चळवळ या संस्थेचा स्थापनेपासून सचिव.
‘आयुष्याचे गाणे’ हा काव्यसंग्रह, ‘मन उधाण वाऱ्याचे’ हा ललित लेखसंग्रह आणि ‘सूत्रसंचालनासाठी’ अशी साहित्यसंपदा प्रकाशित झाली आहे.
साहित्यसंपदेस मानाचे बरेच पुरस्कारदेखील प्राप्त झालेले आहेत. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे:
* साने गुरुजी प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा राज्य पुरस्कार.
* चंद्रपूर येथील राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार.
* जळगाव येथील उत्तर महाराष्ट्रीय सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार.
* मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फौंडेशनचा राज्य पुरस्कार.
* अहमदनगर येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेचा राज्य पुरस्कार
* स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार
* स्व.शांतीलाल संघवी (सर) प्रतिष्ठानचा मानाचा नाशिकरोड भूषण पुरस्कार.
– आत्तापर्यंत बऱ्याच राज्यस्तरीय वक्तृत्व, काव्य, निबंध आदी स्पर्धांचे परीक्षण केले आहे. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी संपन्न झालेल्या इगतपुरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
– ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत डोंबिवली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि एप्रिल २०१७ मध्ये औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात ‘निमंत्रित कवी’ म्हणूनही नाशिककरांच्या वतीने सहभाग नोंदवला आहे.
अप्रतिम कविता आणि चित्र
धन्यवाद मित्रा
आई अभंग अभंग – सुंदर रचना आणि अप्रतिम अक्षरचित्र, दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन.
सरजी आभार
वास्तवात जगणारा कवी
मित्रा धन्यवाद
सरजी धन्यवाद
मित्रा आभार
सर्वांचे मनापासून आभार
सुंदर परीचय .