योगिनी राऊळ, मुंबई
yogini.raul@gmail.com
परिचय-
– आयडीबीआय बँक या सरकारी उपक्रमाच्या बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन गेली सात वर्षे लेखन/पत्रकारिता
स्त्री-मुक्ती संघटनेच्या विश्वस्त मंडळावर १९८५ पासून कार्यरत. `प्रेरक ललकारी’ या स्त्री-चळवळीच्या मासिकाच्या संपादक मंडळावर २०१२ पासून कार्यरत
– हिंदी-इंग्रजी-मराठी भाषांतील भाषांतराचे सातत्याने काम; त्यात कायदेविषयक भाषांतरात प्रभुत्व
– `मी मराठी लाईव्ह’ या दैनिकात स्त्री-विषयक कायद्यांची माहिती देणारे सदर `कायद्याचे बोल’ याचे सहा महिने लेखन
– नागपूर तरुण भारत या दैनिकात स्त्री-साहित्यविषयक सदर ‘ती सध्या काय लिहिते?’ याचे एक महिना लेखन
– `साम’ वाहिनीवर स्त्री-विषयक प्रश्नांवरच्या चर्चेत सहभाग
– प्रसिद्धीमाध्यमे आणि सामाजिक प्रश्न या विषयावर नियमित लेखन
– `Dr. Ambedkar’s Thoughts for Social Justice’ या विषयातील मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात २०१३ साली प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचा आणि विचारधारेचा विशेषत्वाने अभ्यास
– स्त्री सक्षमीकरण, स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन तसेच सामाजिक न्यायासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज यावर ठीकठिकाणी व्याख्याने.
– गेली दहा-बारा वर्षे काव्यलेखन. `शब्ददर्वळ’, `सृजन’, `सार्वजनिक पत्रीसरकार’, `संवाद’, `वाघूर’, `सर्व देशबांधव’, `प्रेरक ललकारी’ `झपूर्झा’, `सावाना’ आदी नियतकालिकांतून कविता प्रकाशित.
– `बाईपणातून बाहेर पडताना…’ या काव्यसंग्रहाचे मे २०१५ मध्ये प्रकाशन.
( या काव्यसंग्रहाला तीन पुरस्कार मिळाले आहेत )
– ‘मुखवटा उतरवल्यावर…’ या काव्यसंग्रहाचे जून २०१९ मध्ये प्रकाशन.
( या दुसऱ्या काव्यसंग्रहाला आतापर्यंत चार पुरस्कार जाहीर झाले आहेत )
-लमुंबई, नाशिक, पुणे, सावंतवाडी, पणजी या ठिकाणी काव्यवाचनाचा अनुभव
– मुंबई आकाशवाणीवर प्रजासत्ताक दिनानिमित्त `सर्व भाषा कविसंमेलन’ कार्यक्रमाअंतर्गत सलग ५ वर्षे भाषांतरित कवितांचे सादरीकरण.
– महाराष्ट्र शासनाच्या २०२० सालच्या महिला दिन विशेष कवयित्री संमेलनात सहभाग.
– `सार्वजनिक पत्रीसरकार’, `प्रेरक ललकारी’, `युगवाणी’, `सर्व देशबांधव’ इत्यादी अंकांसाठी स्वतंत्र व भाषांतरित कथालेखन.
योगिनी राऊळ यांच्या ‘दुर्बोध संन्याशी’ या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…..
-विष्णू थोरे,चांदवड